Dharashiv
महाराष्ट्र
Dharashiv : 'तुमच्या विना हा विजय अधुरा, 'अजितदादांच्या चरणी विजय समर्पित'; धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dharashiv) धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'तुमच्या विना विजय अधुरा, 'अजितदादांच्या चरणी विजय समर्पित' असे या बॅनरवर लिहिण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात हे बॅनर झळकले असून जिल्हा परिषद निकालानंतर लगेचच लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सहा जागा तर पंचायत समितीत अनेक ठिकाणी सदस्य निवडून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहे.
Summary
धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
'तुमच्या विना विजय अधुरा'
'अजितदादांच्या चरणी विजय समर्पित'
