NCP : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी; राष्ट्रवादीची मागणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे.
या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. या घटनेचा आता तपास करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी राष्ट्रवादीकडून मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राष्ट्रवादी सीबीआय चौकशी प्रकरणी पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळत असून काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निवेदन देण्यात आले.
Summary
अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राष्ट्रवादी पत्र पाठवणार
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीकडून निवेदन
