Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांकडे असलेली खाती आता कोणाकडे जाणार? आज राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले जाण्याची शक्यता

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Ajit Pawar ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.

या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला असून या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे अजित पवार यांच्याकडे असलेली खाती आता कोणाकडे जाणार?

याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांच्या निधनाने राज्य उत्पादन, क्रीडा आणि अर्थमंत्री पद रिक्त झाले असून आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले आहे.

Summary

  • राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

  • अजित दादांकडे असलेली खाती आता कोणाकडे जाणार ?

  • राष्ट्रवादीकडून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले जाण्याची शक्यता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com