NCP
NCP

NCP : राष्ट्रवादीने जिल्हा परिषद, पंचायत समितीचा प्रचार थांबवला; मतदारांना केवळ पत्रके वाटून प्रचार करणार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(NCP) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीने जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रचार थांबवण्यात येणार असून कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो होणार नसल्याची माहिती मिळत आहे. मतदारांना केवळ पत्रके वाटून प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे.

निवडून आल्यानंतरही कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही आहे. काल राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

Summary

  • राष्ट्रवादीने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवला

  • अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय

  • कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो होणार नाहीत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com