Bhandara : भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर; मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bhandara) भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 249 गावांना अधिग्रहित करण्यात आलं. मागील ४० वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहेत.
वारंवार निवेदन दिले मोर्चे काढलेत विविध प्रकारची आंदोलने केलीत मात्र शासनाकडून केवळ आश्वासन देण्यात येते, असा आरोप करण्यात येत आहे.
प्रकल्पग्रस्त भाऊ कातोरे, दिलीप मडामे यांच्यासह अन्य काही प्रकल्पग्रस्त थेट नागपूर - भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील कवडशी फाट्यावर असलेल्या 80 फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत थेट मंत्र्यांसोबत चर्चा होणार नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही अन्यथा उंच टाक्यावरून उडी घेऊ असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
Summary
भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर
मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 249 गावं अधिग्रहित
