PM Kisan Nidhi
PM KISAN NIDHI 22ND INSTALLMENT UPDATE: ELIGIBLE FARMERS MAY RECEIVE ₹4,000 DIRECTLY

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! बँक खात्यात थेट जमा होणार ४००० रुपये, जाणून घ्या

Government Schemes: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २२ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी ही योजना पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देते, जी तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.

याआधी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी २१ व्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झाले होते. आता फेब्रुवारी महिना सुरू असला तरी २२ वा हप्ता अद्याप मिळालेला नाही, ज्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी अनेक पात्र शेतकऱ्यांना दोन हजार ऐवजी थेट चार हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.

हे विशेषतः ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि अर्जातील त्रुटी दुरुस्त केल्या आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी आहे. कारण मागील हप्त्यात अशा तक्रारींमुळे काही लाभार्थींना रक्कम मिळालीच नव्हती. होळी सणाच्या आधी, म्हणजेच ४ मार्च २०२६ पूर्वी हा २२ वा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे. सरकारने अद्याप नेमकी तारीख जाहीर केलेली नसली तरी लाभार्थ्यांना तयारी करण्याचे आवाहन केले जात आहे.

जे शेतकरी अजून ई-केवायसी करत नाहीत, त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे dbt.pmfby.gov.in किंवा pmkisan.gov.in वर जाऊन आधार लिंकिंग आणि केवायसी त्वरित पूर्ण करावी. हेल्पलाइन १५५२६ वर संपर्क साधूनही मदत मिळू शकते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक आधार मिळतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

Summary
  • पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता

  • काही पात्र शेतकऱ्यांना थेट ४,००० रुपये मिळू शकतात

  • ई-केवायसी व आधार लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक

  • होळीपूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com