Electricity Supply
Electricity Supply

Electricity Supply : अमरावती आणि यवतमाळमधील शासकीय कार्यालयांचा वीजपुरवठा 'या' दिवशी खंडित होणार; कारण काय?

अमरावती आणि यवतमाळमधील शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Electricity supply) अमरावती आणि यवतमाळमधील शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील 16 हजार शासकीय कार्यालयांचा वीजपुरवठा 24 तासांसाठी खंडित केला जाणार आहे.

शासकीय कार्यालयावर 439 कोटी थकीत वीजबिलांवर महावितरणाने इशारा दिला असून 12 फेब्रुवारीला 16,981 शासकीय कार्यालयांचा 24 तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. 22 जानेवारीला 4 तास टोकन डिस्कनेक्शननंतरही बिल भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यातच

अमरावती जिल्ह्यात 8,191 कार्यालयांकडे 132.28 कोटी थकबाकी असून यासोबतच यवतमाळ जिल्ह्यात 8,790 कार्यालयांकडे 306.52 कोटी थकबाकी असल्याची माहिती मिळत आहे. एप्रिल 2025 पासून 5,427 कार्यालयांनी एकदाही बिल भरले नसल्याची माहिती मिळत असून कारवाईनंतरही थकबाकी राहिल्यास कायमस्वरूपी वीज खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Summary

  • अमरावतीतील शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित होणार

  • 24 तासासाठी वीज पुरवठा खंडित होणार

  • 12 फेब्रुवारीला 16 हजार कार्यालयांचा वीजपुरवठा बंद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com