पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला; फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ‘एन्ट्री’

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला; फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ‘एन्ट्री’

Published by :
Published on

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे तब्बल पाच दिवस बंद असणारा महामार्ग आजपासून फक्त अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. अजूनही या राष्ट्रीय महामार्गावर शिरोली दरम्यान दोन फूट पाणी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोकलँड मशीन द्वारे चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

फक्त पुण्यावरून कोल्हापूरकडे येणाऱ्या बाजूचं पाणी कमी झाल्यामुळे प्रशासनाने चाचणी यशस्वी झालेल्या झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com