Pune International Airport : पुरंदर विमानतळासाठी भागीदारी निश्चित,औद्योगिक विकास महामंडळाचा 51% हिस्सा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला मोठा बूस्ट मिळाला असून, यातील भागीदारीची रचना निश्चित करण्यात आली आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाला (CIDCO) सर्वाधिक ५१ टक्के हिस्सा मिळाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) प्रत्येकी १५ टक्के समभाग ठरवण्यात आले आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (MADC) १९ टक्के वाटा देण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यासाठी सुमारे ६,००० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, हा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने या कर्ज प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली असून, जून २०२६ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प वेग घेईल, असे अपेक्षित आहे.
पुरंदर विमानतळामुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. लॉजिस्टिक्स, एमएसएमई उद्योग, कृषी निर्यात आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, तर आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढून परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नावाने उभारला जाणारा हा विमानतळ नवी मुंबई विमानतळानंतर महाराष्ट्रातील दुसरा मोठा हवाई मार्ग ठरेल.
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भागीदारी रचना निश्चित: CIDCO ५१%, MIDC व PMRDA १५%, MADC १९%
भूसंपादनासाठी ₹६,००० कोटी कर्ज मंजूर; जून २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण
प्रकल्पामुळे पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक, लॉजिस्टिक्स, पर्यटन क्षेत्राला चालना
आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी सुधारेल, परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मिळेल; महाराष्ट्रातील दुसरा मोठा हवाई मार्ग
