Pune Weather
PUNE HEATWAVE ALERT: EXTREME TEMPERATURES EXPECTED OVER NEXT TWO DAYS

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! पुढील दोन दिवस पुणेकरांसाठी उकाड्याची रेड अलर्ट, तापमानामुळे सावधगिरी बाळगा

Summer In Pune: पुणेकरांनो, पुढील दोन दिवस शहरात उकाड्याची तीव्रता वाढणार आहे. कमाल तापमान ३४°C पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानामध्ये होणारी वाढ कायम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत हवामानामध्ये हळूहळू बदल होणार असून, कमाल आणि किमान तापमानामध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, शहरात उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या दिवशी तापमान स्थिर राहिले. दरम्यान, शहरात सकाळी आणि रात्री गारवा तर दुपारी कडक ऊन असा संमिश्र वातावरण पुढेकर अनुभवत आहेत. शुक्रवारी (ता. १३) पुणे आणि परिसरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

शनिवारपासून (ता. १४) मात्र कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होणार असून, कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या बदलामुळे पुणेकरांना उकाड्याची अधिक तीव्रता जाणवणार आहे.

दुसरीकडे, उत्तर भारतात हवामानात कमालीचा बदल जाणवत आहे. देहरादूनसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, वादळासह पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद जाहीर करण्यात आल्या आहेत.

Summary
  • पुढील दोन दिवस पुण्यात उकाडा वाढणार, कमाल तापमान ३४°C पर्यंत.

  • गुरुवारी ३२°C, किमान तापमान १४°C नोंदवले.

  • शनिवारपासून तापमानात मोठी वाढ; आकाश निरभ्र राहण्याची शक्यता.

  • नागरिकांना उन्हापासून बचावासाठी आणि भरपूर पाणी पिण्याची सूचना.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com