Rajyasabha Election : राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी; काही प्रमुख नावांची चर्चा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rajyasabha Election) राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी पार पडणार आहे.
याच्याआधी यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च असून 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवले गेले. त्यामुळे आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हावा, असे भाजपच्या एका गटाचे मत असल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा असून यामध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, रामदास आठवले यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
राज्य सभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली
राज्यसभेवर आयारामाना संधी न देता पक्षातील निष्ठावंताना संधी मिळावी, यासाठी भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न
भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा
