राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरण; चौघांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरण; चौघांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

Published by :
Published on

रुपेश होले | राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील चौघा आरोपींवर 'मोका' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ३१ मे रोजी गोळीबार झाला होता.हा गोळीबार राजकीय वादातून केला होता. यात राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांना एक गोळी लागली होती. रविराज हे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. सध्या रविराज यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान आज या प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण चौघांवर मोका लावण्यात आला असून यापैकी एक अल्पवयीन आहे. प्रशांत मोरे, विनोद मोरे, राहुल उर्फ रीबल यादव यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com