Zilla Parishad Election : 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न; कोण गुलाल उधळणार? उद्या लागणार निकाल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Zilla Parishad Election) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं. उद्या सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. काल सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडलं. यासोबतच उद्या 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोया पूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून आता उद्या कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न
प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू
जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची? उद्या लागणार निकाल
