Nashik : दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालकाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Nashik ) दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालकाने पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राँग साइडने येणारी रिक्षा अडवल्याचा राग मनात धरून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करण्यात आला असून यामध्ये पोलीस अंबादास तांदळे जखमी झाले आहेत. यामध्ये साथीदार दुचाकीस्वारासह दोघांविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवडाभरात ही दुसरी घटना घडली असून वाहतूक नियम तोडल्याबद्दल जाब विचारताच रिक्षा चालकाने वाद घातला होता. यामुळे आता वाहतूक पोलीसच असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली असून आता संताप व्यक्त केला जात आहे.
Summary
दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालकाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला
राँग साइडने येणारी रिक्षा अडवल्याचा राग मनात धरून मारहाण
साथीदार दुचाकीस्वारासह दोघांविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल
