Ajit Pawar Plane Crash
ROHIT PAWAR CONFIRMS AJIT PAWAR DEATH IN PLANE CRASH IN EMOTIONAL PRESS CONFERENCE

Rohit Pawar: जळालेला स्वेटर, बंद घड्याळ आणि रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत उघड केले धक्कादायक सत्य

Ajit Pawar Plane Crash: रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची पुष्टी केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी आज दहा फेब्रुवारी रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट खुलासा केला.

रोहित पवारांचा भावनिक खुलासा

रोहित पवार म्हणाले, अजितदादा आज हयात नाहीत आणि त्यांचा विमान अपघातच झाला होता. अपघातानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते, ज्यात विमानात पाच ऐवजी सहा जण असल्याचे आणि सहावी व्यक्ती म्हणजे अजितदादा असल्याचे सांगितले जात होते, तर काहींनी दावा केला की सापडलेली बॉडी दादांची नव्हती आणि ते परत येतील. या सर्व चर्चा थांबवण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. काल पिंपरी चिंचवडमध्ये सिग्नल लागल्यावर एका रिक्षाचालकाने विचारले की ९ तारखेला अजितदादांबद्दल काय सांगणार, मी त्याला १० तारखेला सांगतो असे प्रत्युत्तर दिले, तर काहींनी भावनिक व्हिडिओ टाकले असल्याचेही नमूद केले.

पुरावे आणि वैयक्तिक अनुभव

अपघातानंतर सहा दिवस मला वाटत होते की ही एक घाणेरडी स्वप्न आहे आणि दादांचा अपघातच झाला नाही, पण जेव्हा मी त्यांचा जळालेला स्वेटर, चप्पल आणि घड्याळ पाहिले तेव्हा सत्य समोर आले. अजितदादा दररोज घड्याळ घालायचे आणि ते नेहमी १५ मिनिटे पुढे असायचे, या घड्याळात ९ वाजले होते आणि ते बंद पडलेले होते, यावरून मला पटले की दादा हयात नाहीत. आज दादा आपल्यात नसले तरी विचाराने ते आपल्यासोबत आहेत असे म्हणत रोहित पवार भावुक झाले.

प्रयत्न आणि संदेश

सर्व माहिती गोळा करण्यासाठी आम्ही सरकारबाहेर असूनही प्रयत्न केले, कारण दादा आणि साहेबांनी प्रयत्न करत राहा असे सांगितले होते. लोकांना खरे काय घडले ते कळले पाहिजे, म्हणून ही माहिती समोर ठेवली असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. या खुलासामुळे राज्यातील चर्चांना पूर्णविराम मिळाला असून पवार कुटुंबाचा हा धीरगंभीर पवित्रा चर्चेत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com