Rohit Pawar : रोहित पवार दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर ; दिल्लीत राजकीय गाठीभेटी

रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Rohit Pawar) रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार दोन दिवस दौऱ्यावर आहेत.

आज आणि उद्या दिल्ली दौऱ्यावर असताना रोहित पवार दिल्लीत राजकीय भेटी घेणार आहेत. यासोबतच शरद पवार यांच्या जवळच्या लोकांना ते भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दिल्लीत रोहित पवार माध्यमांशी देखील बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Summary

  • रोहित पवार 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर

  • रोहित पवार दिल्लीत राजकीय भेटी घेणार

  • माध्यमांशी संवाद देखील साधण्याची शक्यता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com