महाराष्ट्र
Paithan : पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Paithan) छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भिडल्याची माहिती मिळत असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच महायुतीत राडा झाला. खिडकीतून फॉर्म दिल्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेने आक्षेप घेतल्याने प्रक्रिया अर्धा तास ठप्प झाल्याची माहिती मिळत असून अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Summary
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भिडले
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच महायुतीत राडा
