Sanjay Raut : संघाच्या कार्यक्रमात सलमान खानच्या उपस्थिती; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sanjay Raut) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत 'नवे क्षितिज' या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी सलमान खानने देखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

याच सलमान खानच्या उपस्थितीवरून आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "त्या कार्यक्रमात सलमान खानचं स्वागत होते. एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? "

"सलमान खान या फक्त नटाला आमंत्रण होते व्यासपीठावर की संघात यापुढे मुस्लिमांना प्रवेश, स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवत यांनी स्पष्ट केलं असते तर योग्य झालं असते." असे संजय राऊत म्हणाले.

Summary

  • संघाच्या कार्यक्रमातील सलमान खानच्या उपस्थितीवरुन संजय राऊतांनी टोला लगावला

  • "भागवतांच्या कार्यक्रमात सलमानचं स्वागत झालं, म्हणजे संघामध्ये मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का?"

  • "सलमान खान या फक्त नटाला आमंत्रण होते व्यासपीठावर की संघात यापुढे मुस्लिमांना प्रवेश आहे?"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com