Sanjay Raut : "भविष्यात शरद पवार हे अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीत येतील"; खासदार संजय राऊत यांचा दावा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Sanjay Raut ) दोन्ही राष्ट्रवादीने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका एकत्र लढल्याने पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "शरद पवार हे अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीत येतील. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत."
"त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत. तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाट लावलेला आहे. अशावेळेला त्यांच्या तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार खात्री मला अशी आहे की, भविष्यामध्ये शरद पवार, अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला दिसतील."
"सरकारमधून त्यांना बाहेर पडावं लागेल. दोन दगडावर पाय कसे ठेवणार. त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल किंवा काहीतरी एक स्वीकारावे लागेल." असे संजय राऊत म्हणाले.
Summary
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युतीमध्ये लढवली
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला
"शरद पवार हे अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीत येतील"
