Satej Patil
Satej Patil

Satej Patil : "दावोसमधील गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका काढा"; काँग्रेस नेते सतेज पाटील यांची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Satej Patil)राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर आहेत. या दावोस दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सतेज पाटील म्हणाले की, "दावोसमधील गुंतवणुकीवर त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. 2014 ते 2019पर्यंत दावोसला गेल्यानंतर काय झालं आणि आमच्या महाविकास आघाडीच्या काळात करार केले त्याची परिस्थिती आम्ही देखील सांगू."

"40 लाख कोटी, 30 लाख कोटी हे आकडे ऐकूनच लोकांना काळजी वाटायला लागली आहे की, नोकरी उपलब्ध असणार आणि माणसं मिळणार नाहीत. अशी अवस्था होतेय का महाराष्ट्रात असे आमच्या बेरोजगार तरुणांना वाटायला लागलं आहे." असे सतेज पाटील म्हणाले.

Summary

  • 'दावोसमधील गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका काढा'

  • काँग्रेस नेते सतेज पाटील यांची मागणी

  • 'मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन काय केलं?

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com