नाशिक मनपा हद्दीतील शाळा पुन्हा बंद

नाशिक मनपा हद्दीतील शाळा पुन्हा बंद

Published by :
Published on

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता मनपा हद्दीतील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील आदेश येईंपर्यत सर्व शाळा बंद राहणार आहेत.

नाशिक मनपा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढला होता. त्यामुळे दररोजची वाढती रुग्णसंख्या पाहता येत्या 15 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता 5 ते 8, 9 वी आणि 11 वी चे वर्ग बंद ठेवण्यात येणार आहे. तर 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती असेल तरचं शाळा सुरू राहणार आहेत.

दरम्यान आता 15 मार्चला पुन्हा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी कोरोना संसर्ग वाढत असल्यास पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com