Ratnagiri
Ratnagiri

ShivSena : रत्नागिरीतील नाणीज पंचायत समितीतून शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे बिनविरोध

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ratnagiri ) जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

तर 7 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटची तारीख होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यात पहिले खाते उघडले आहे.

रत्नागिरीत शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला असून नाणीज पंचायत समितीतून डॉ. पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आल्या आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कांबळे यांच्या शिवाय एकही उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पद्मजा कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

Summary

  • रत्नागिरीत शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

  • नाणीज पंचायत समितीतून डॉ. पद्मजा कांबळे बिनविरोध

  • उद्योग मंत्री उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे बिनविरोध

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com