Solapur : अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलाने केलं मतदान, नेमकं काय घडलं? Video
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Solapur) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे आणि सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे.
यासोबतच 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचे पाहायला मिळत आहे.
या प्रकारामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अर्जुन सिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी वैष्णवी मोहिते पाटील दोघेही निवडणूक लढत आहेत.
Summary
अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार
वडिलांसोबत गेलेल्या लहान मुलाने केलं मतदान
अर्जून सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने केले मतदान
