अंबरनाथ तालुक्यात लग्नात हवेत गोळीबार; पोलिसांकडून चौकशी सुरू

अंबरनाथ तालुक्यात लग्नात हवेत गोळीबार; पोलिसांकडून चौकशी सुरू

Published by :
Published on

मयूरेश जाधव | अंबरनाथ तालुक्यात पार पडलेल्या एका लग्नात हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिललाईन पोलिसांकडून व्हिडीओची चौकशी सुरू केली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका लग्नातला हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आलीये. मलंगगड परिसरातील हाजीमलंगवाडी गावात २९ नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नात शिवाजी पाटील नामक इसमाने मोठ्या बंदूकीतून हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. याच व्हिडिओमध्ये एक तरुण हातात रिव्हॉल्वर घेऊन उभा असल्याचं दिसत असून त्याच्या बाजूला याच गावातील उपसरपंच देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिललाईन पोलिसांकडून व्हिडीओची चौकशी सुरू करण्यात आलीये. ज्या बंदूकीतून हा गोळीबार करण्यात आला ती बंदूक नेमकी कोणत्या प्रकारची होती? यासह सर्वच गोष्टींचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या घटनेत दोषी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिलीय. मात्र अद्याप या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसल्यानं कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी तूर्तास नकार दिलाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com