ZP Election : सोशल मीडिया स्टार निर्मला नवले यांचा शिरूर पंचायत निवडणुकीत नेमकं काय झालं?
Nirmala Shubham Nawale : शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव–कान्हूर मेसाई गणातून निवडणूक लढवलेल्या सोशल मीडिया स्टार निर्मला नवले यांना यंदा पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या नवले यांना भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी सुमारे ३०० मतांनी हरवले.
इन्स्टाग्रामवर लाखो चाहत्यांची फौज असलेली निर्मला नवले त्यांच्या हटके स्टाईल, स्पष्ट वक्तव्ये आणि रिल्समुळे नेहमीच चर्चेत असतात. आयटी इंजिनिअर असलेल्या नवले या याआधी कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे यंदा त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, सोशल मीडियावरील लोकप्रियता मतपेटीपर्यंत पोहोचू शकली नाही.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. आतापर्यंत ७३ जागांचे निकाल लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्यात प्रचारात फारशी गती नव्हती, तरीही सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला मिळताना दिसतोय.
सोशल मीडियावरची चमक आणि प्रत्यक्ष राजकारणातील वास्तव यातील फरक या निकालातून पुन्हा एकदा समोर आला आहे.
थोडक्यात
शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव–कान्हूर मेसाई गणातून निवडणूक लढवली.
सोशल मीडिया स्टार निर्मला नवले यांचा पराभव.
नवले यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मैदानात उतरण्यात आले होते.
भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी सुमारे ३०० मतांनी हरवले.
निवडणूक निकालात भाजप उमेदवार विजयी.

