Shivsena : सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shivsena) जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. बार्शी तालुक्यात दोन्ही शिवसेनेची महाआघाडी झाली असून भाजपविरोधात दोन्ही शिवसेना,दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Summary
सोलापूरात झेडपी निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र
बार्शी तालुक्यात दोन्ही शिवसेनेची महाआघाडी
भाजपविरोधात दोन्ही शिवसेना,दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी
