Chhatrapati Sambhajinagar
महाराष्ट्र
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात झाला.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरात भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मागून आलेल्या कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत शहाबाज कमरोद्दीन बागवान या तरुणाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. नारेगावच्या अजीज कॉलनीत राहणारे शहाबाज हे चिकलठाण्यातील जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री दुकानात फायनान्सचे काम करत होते. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरात भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक
अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
