Mumbai Coastal Road : कोस्टल रोडवरील वेगावर आता ब्रेक लागणार; वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Coastal Road) मुंबईतील कोस्टल रोडवर होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोस्टल रोडवर होणाऱ्या धोकादायक ड्रायव्हिंगमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता कोस्टल रोडवरील वाहतुकीच्या वेगावर आता ब्रेक लागणार असल्याची माहिती मिळत आहे. धोकादायक ड्रायव्हिंगमुळे अपघात वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत असून वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.
मुख्य कोस्टल रोडवर 80 किमी, बोगद्यात 60 किमी आणि इंटरचेंजरवर 40 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ई-चलन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडासह नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
Summary
कोस्टल रोडवरील वेगावर आता ब्रेक लागणार
वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई
ई-चलन प्रणाली कार्यान्वित, ANPR कॅमेरे सुरू
