Baramati
महाराष्ट्र
Baramati : बारामती विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अनेक नेतेमंडळी दाखल होणार असल्याने सुरक्षेत वाढ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
(Baramati ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बारामतीत आज अनेक नेतेमंडळी दाखल होणार असल्याने सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
