Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे 'या'तीन खात्यांची जबाबदारी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sunetra Pawar) सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच्या आधी विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली.
सुनेत्रा पवार राज्याच्या 11 व्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या असून राष्ट्रवादी पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार स्वतः सांभाळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे खात्यांचे वाटप झाले आहे. सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी मिळाली आहे.
Summary
सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची जबाबदारी
सुनेत्रा पवारांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यक विकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली
