Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित; राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sunetra Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाले आहे. 28 जानेवारीला अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक आज पार पडणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील वरळी येथील 'डोम' मध्ये आयोजित करण्यात आली असून संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे.

याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. यासोबतच पक्षाने सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

Summary

  • राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित

  • राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची आज बैठक

  • सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com