Sunetra Pawar
Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार

सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sunetra Pawar) सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच्या आधी विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली.

सुनेत्रा पवार राज्याच्या 11 व्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या असून राष्ट्रवादी पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार स्वतः सांभाळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर काल सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली. त्यानंतर आता त्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार

  • बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याचे माहिती

  • पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com