Sunetra Pawar
SUNETRA PAWAR TO TAKE OATH AS MAHARASHTRA’S FIRST WOMAN DEPUTY CHIEF MINISTER

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला डेप्युटी CM

First Woman Deputy CM: अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्या सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी बैठक करून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील विधानभवनात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात गट नेत्याची निवड केली जाईल.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. या बैठकीत गट नेत्याची निवड कशी करायची आणि इतर महत्त्वाचे मुद्दे कसे उपस्थित करायचे यावर विचारमंथन होत आहे. पक्षाकडून विधानमंडळाला पत्र पाठवून उद्या सकाळी ११ वाजता आमदारांच्या बैठकीसाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अद्याप अधिकृत निरोप नसला तरी राष्ट्रवादीचे अनेक नेते सावधगिरी बाळगत मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही आमदार आज रात्रीच पोहोचणार असून, उर्वरित उद्या सकाळी मुंबईत असतील.

या घडामोडींचे बीज अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी पेरले आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा होकार मिळवला आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल हे सर्वजण वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत होते. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या शपथसोहळ्याची तारीख आणि वेळ निश्चित झाली असून, सायंकाळी हा सोहळा पार पडेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com