Sunetra Pawar
Sunetra Pawar

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं ट्विट म्हणाल्या...

सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sunetra Pawar) सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच्या आधी विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली. सुनेत्रा पवार राज्याच्या 11 व्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या असून राष्ट्रवादी पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार स्वतः सांभाळणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, 'आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.'

'दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.' असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

Summary

  • उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं ट्विट

  • 'या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे'

  • 'दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com