Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sunetra Pawar) अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली. 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौर्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा दौरा केल्यानंतर आज सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौर्याला विशेष महत्व आलं आहे. दिल्ली दौऱ्यामधे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील सोबत असणार आहेत.
Summary
काल सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला
शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार
