Sunetra Pawar
Sunetra Pawar

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करणार

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sunetra Pawar) सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच्या आधी विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली.

सुनेत्रा पवार राज्याच्या 11 व्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या असून राष्ट्रवादी पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार स्वतः सांभाळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यानंतर आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. यासोबत अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

  • आज करणार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन

  • अजितदादांचे सुरक्षारक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांचीही घेणार सांत्वनपर भेट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com