KDMC युनियनच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो पु्न्हा दिसणार

KDMC युनियनच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो पु्न्हा दिसणार

केडीएमसी मुख्यालयात शिवसेना प्रणित म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो काढल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

अमझद खान |कल्याण : केडीएमसी मुख्यालयात शिवसेना प्रणित म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो काढल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज्यात अन्य ठिकाणी फोटो काढण्यावरुन उद्रेक सुरु आहे. मात्र या ठीकाणी उद्रेक होऊ नये. फोटो पुन्हा लावण्यात यावा यासाठी मी आग्रह धरणार असल्याची भूमिका शिंदे गटाला समर्थन देणारे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केली आहे.

KDMC युनियनच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो पु्न्हा दिसणार
Edible Oil |खाद्यतेलाच्या किंमती आणखी 10 रुपयांनी घटणार!

डोंबिवली शहर शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावला गेला. शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका महिला पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. हा तपास सुरु असतांना केडीएमसी मुख्यालयात असलेल्या म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनाही शिवसेना प्रणित मान्यता प्राप्त संघटना आहे. या संघटनेच्या कार्यालयातून मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो काढल्याची चर्चा जोरात सुरु होती. याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळ हरदास यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जेव्हा शिंदे यांना नेते पदावरुन हटविण्यात आले होते. त्याचवेळी त्यांचा फोटो काढला होता. याला बरेच दिवस उलटून गेले आहे. त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.

KDMC युनियनच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो पु्न्हा दिसणार
Railway Police | फिल्म इंडस्ट्रीजच्या स्पॉट बॉयला रेल्वे पोलिसांनी केली अटक

परंतू शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनाही ही सर्व कामगारांची संघटना आहे. कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे जातात. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना पक्षाने गृहीत धरु नये. फोटो काढण्याच्या घटना राज्यभरात होत आहेत. त्यामुळे दोन गटात उद्रेक होत आहेत. कल्याण पश्चिमेत असा कोणता प्रकार नाही. मात्र युनियनच्या पदाधिका:यांची बोलून हा वाद मिटविण्याचा मी प्रयत्न करणार आहे. फोटो लावण्यासाठी मी आग्रह धरेन अशी माहिती विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com