Ajit Pawar Death in Plane Crash
Ajit Pawar Death in Plane Crash

Ajit Pawar Death in Plane Crash : विमान अपघातानंतर प्राथमिक तपास अहवाल आला समोर; अहवालात नेमकं काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Ajit Pawar Death in Plane Crash ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

अजित पवारांसह या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. यातच आता विमान अपघातानंतर प्राथमिक तपास अहवाल आता समोर आला आहे.

दुर्घटनाग्रस्त बॉम्बार्डियर लियरजेट- 45 विमान उड्डाणासाठी योग्य होतं. त्यात कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी, समस्या नव्हत्या, अशी माहिती तपास अहवालात आहे. विमानात असलेल्या दोन्ही पायलट परवानाधारक होते. तसेच वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होते. बारामतीत अपघातग्रस्त झालेल्या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK होता. हे चार्टर्ड विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून चालवण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

विमानात कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. त्याबद्दलचं एअरवर्दीनेस प्रमाणपत्र १० सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलं होतं. त्याची वैधता १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत होती. विमानाचे प्रमुख पायलट असलेल्या सुमित कपूर यांच्याकडे १५ हजार पेक्षा अधिक तास विमान उडवण्याचा अनुभव होता. को-पायलट शांभवी पाठक यांना विमान उडवण्याचा अनुभव होता. असे प्राथमिक अहवालात सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com