NCP
NCP

NCP : येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(NCP) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर आता येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार असून राज्याच्या अधिवेशन काळातच सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील सगळ्या नेत्यांचा सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • येत्या दोन आठवड्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडणार

  • राज्याच्या अधिवेशन काळातच सुनेत्रा पवार होणार राष्ट्रीय अध्यक्षा

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील सगळ्या नेत्यांचा सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com