Mumbai
Mumbai

Mumbai : 'या' तारखेपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; आज होणार कामकाज सल्लागार समितीची बैठक

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Mumbai ) राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्शभूमीवर आज विधानभवन येथे संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कामकाज आणि कामकाजाचा कालावधी निश्चित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच राज्याचा सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज दुपारी 3 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून विधीमंडळ समिती कक्षात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

Summary

  • अर्थ संकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजणार

  • आज दुपारी 3 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक

  • विधीमंडळ समिती कक्षात होणार बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com