Budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस; विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Budget session) महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस असून हा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत.
अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता असून विरोधक पुन्हा एकदा सभागृहात आक्रमक होताना पाहायला मिळतील. यासोबतच विरोधकांकडून आज पायऱ्यांवर आंदोलन देखील करण्यात येईल.
विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता असून विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चेला सुरुवात होणार आहे. विरोधकांचाही प्रस्ताव चर्चेला येणार असून सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी अधिवेशनादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस
विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चेला होणार सुरुवात
विरोधकांचाही प्रस्ताव चर्चेला येणार
