Election
Election

Election : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरता अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Election ) जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरता अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.

आज दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. तर दुपारी 3.30 वाजता अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेता येणार

  • अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

  • दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com