Budget session : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस; राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Budget session) महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून हा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत.
अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता असून विरोधक पुन्हा एकदा सभागृहात आक्रमक होताना पाहायला मिळतील. यासोबतच विरोधकांकडून आज पायऱ्यांवर आंदोलन देखील करण्यात येईल.
काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले होते. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत असून या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.
Summary
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस
अधिवेशनाचा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता
आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार
