Today’s Top Breaking News
TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW

Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Mayor of Mumbai : मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवडीबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. महापौरपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 7 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 11 फेब्रुवारी रोजी नव्या महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. याच दिवशी दुपारी 12 वाजता विशेष सभा बोलावण्यात येणार असून सभेला सुरुवात होण्याच्या अगदी 15 मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी (दि. 28) सकाळी घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. सकाळी सुमारे 8.45 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमान कोसळले, या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबर यांचा समावेश आहे. अजित पवार हे 66 वर्षांचे होते. या अपघाताची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली बारामतीत वातावरण अत्यंत शोकाकुल झाले असून पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले. यावर आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.

नेटफ्लिक्सने कोरियन बँड बीटीएसशी हातमिळवणी केली आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मंगळवारी के-पॉप बँड बीटीएससोबत भागीदारीची घोषणा केली. या अंतर्गत, “बीटीएस: द रिटर्न” हा डॉक्युमेंटरी फिल्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. याशिवाय, जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या गटाचा आगामी कॉन्सर्ट देखील प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. यासाठी नेटफ्लिक्सकडे हक्क आहेत.

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेची चर्चा कायम आहे. दरमहा महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होत असले तरी योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांना लाभ मिळाला नाही, तर ई-केवायसी करूनही काहींना पैसे मिळाले नाहीत. यामुळे लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली असता, महिला बालकल्याण विभागाने घरी जाऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

High Court Angry On Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅप आणि त्याची पालक कंपनी मेटा यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जोरदार शब्दांत झापले. भारतीय नागरिकांचा वैयक्तिक डेटा आणि गोपनीयतेशी कुठलीही तडजोड चालणार नाही, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. कायदे पाळता येत नसतील, तर भारतात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, असेही न्यायालयाने ठणकावून सांगितले.

रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम कोडून सोडले आणि भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा गाठला. कडक कथानक आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकल्यानंतर आता दिग्दर्शक आदित्य धर ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ घेऊन परतणार आहेत. चित्रपटाच्या अधिकृत टीझर रिलीजने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून, रणवीर सिंहचा आताप्यंतचा सर्वात शक्तिशाली आणि भयंकर लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

तुर्भे येथील हुंडाई शोरूमसमोरील स्कायवॉकला अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी अचानक भडकलेल्या आगीमुळे पुलावरून जाणारे नागरिक घाबरून इकडेतिकडे धावपळ घालू लागले. आगीच कारण पुलाखाली असलेल्या ज्वलनशील वस्तूंना पेट घालणं असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जात आहे.

ICC अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने गतविजेते ऑस्ट्रेलियासमोर २७८ धावांचं जबरदस्त आव्हान ठेवलं आहे. कर्णधार थॉमस रेव याने शतकी खेळी करून इंग्लंडला मजबूत स्थितीत नेलं. ५० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून इंग्लंडने २७७ धावा केल्या, ज्यात थॉमस रेव यांचा १०० धावांचा खेळीचा वाटा प्रमुख होता.

Nitesh Rane : कोकणच्या विकासासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याने कोकणवासियांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेमार्गाला अखेर गती मिळणार असून हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

Gold-Silver Rate: अमेरिकेचे राष्ट्राधीक्षक डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री भारतावर लादलेला आयात कर (टॅरिफ) कमी करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात कमाल उसळी पाहायला मिळाली. बाजार उघडताच सेन्सेक्स २२०० अंकांनी आणि निफ्टी ७०० अंकांनी वर चढला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com