Dr. Vishal Kadane : प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी वृक्षसंवर्धनाची चळवळ; Dr. Vishal Kadane यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
राजेश गुप्ता
प्रदूषणमुक्त पर्यावरण, दुर्मिळ वृक्षजातींचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण या उद्देशाने 2018 पासून सातत्याने कार्यरत असलेल्या यांच्या वृक्षसंवर्धन कार्याला मोठे यश मिळाले आहे. 10 हजारांहून अधिक मोठ्या वृक्षांचे संवर्धन केल्याबद्दल त्यांची मध्ये मानाची नोंद करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या अथक परिश्रमांची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पावती मानली जात आहे.
गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात सक्रिय असलेले डॉ. विशाल कडणे हे पर्यावरण विषयातील डॉक्टरेट प्राप्त उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व असून त्यांनी वृक्षसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी केवळ वृक्षलागवडीवर भर न देता, आधीपासून अस्तित्वात असलेल्या मोठ्या वयोवृद्ध वृक्षांचे जतन, त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन आणि दीर्घकालीन संवर्धन यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
शहरी भागातील वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली हरित क्षेत्रे आणि नष्ट होत असलेली जैवविविधता याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी डॉ. कडणे यांनी विविध कार्यशाळा, व्याख्याने, शालेय- महाविद्यालयीन उपक्रम, तसेच नागरिकांच्या सहभागातून वृक्षसंवर्धन मोहिमा राबवल्या आहेत. दुर्मिळ आणि स्थानिक वृक्षजातींचे जतन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहे.
10 हजारांहून अधिक वृक्षांचे संवर्धन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदवल्यामुळे पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांकडून डॉ. कडणे यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या पर्यावरणीय धोरणे, वृक्षसंवर्धन मोहिमा आणि जनजागृती उपक्रमांमधील अनुभव मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
थोडक्यात
2018 पासून प्रदूषणमुक्त पर्यावरण, दुर्मिळ वृक्षजातींचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण या उद्देशाने सातत्याने कार्यरत.
या काळात 10,000 हून अधिक मोठ्या वृक्षांचे संवर्धन केले आहे.
त्यांचे वृक्षसंवर्धन कार्य मोठ्या यशासह साजरे केले गेले आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या अथक परिश्रमांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळाली आहे.
या कामामुळे सामाजिक आणि पर्यावरणीय योगदानाची मान्यता मिळाली आहे.

