Adivasi Long March
Adivasi Long March

Adivasi Long March : लाल वादळ इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना; गिरीश महाजनांचे सहकारी संदीप जाधव आंदोलनास्थळी

या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Adivasi Long March) आदिवासी लाँग मार्च काढण्यात आला आहे. हजारो आदिवासींचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करत असून आपल्या विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत.नाशिकहून निघालेल्या या लाँग मार्चमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आज आदिवासी लाँग मार्चवर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आदिवासी लाँग मार्चमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत संबंधित मंत्र्यासोबत आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आता लाल वादळ इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत असून गिरीश महाजनांचे सहकारी संदीप जाधव हे आंदोलनास्थळी पोहचले असून जाधव या किसान सभेच्या शिष्टमंडळाला घेऊन मुंबईला जाणार आहेत. आदिवासी लाँग मार्चमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत आज मुंबईत बैठक पार पडणार आहे.

Summary

  • लाल वादळ इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना

  • महाजनांचे सहकारी संदीप जाधव आंदोलनास्थळी

  • जाधव किसान सभेच्या शिष्टमंडळाला घेऊन मुंबईला जाणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com