Baramati : दोन महिन्यांपूर्वी बारामतीतील अजित पवारांच्या घराजवळ जादूटोण्याचा प्रकार; विमान दुर्घटनेनंतर जादूटोण्याच्या प्रकाराची पुन्हा होतेय चर्चा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Baramati) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला असून या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात काल अंत्यसंस्कार करण्यात आले. यातच आता अजित पवार यांच्या निधनानंतर एका गोष्टीची जास्त चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे दोन महिन्यांपूर्वी बारामतीतील अजित पवारांच्या घराजवळ जादूटोणा करण्यात आला होता.
विमान दुर्घटनेनंतर जादूटोण्याच्या प्रकाराची आता पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. अजितदादांच्या घरापासून काही अंतरावर लिंबू, नारळ आढळले होते. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली होती.
Summary
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
दोन महिन्यांपूर्वी बारामतीतील अजित पवारांच्या घराजवळ जादूटोण्याचा प्रकार
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर जादूटोण्याच्या प्रकाराची पुन्हा होतेय चर्चा
