Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : "ठाकरे नाव पुसायला कुणालाच जमलं नाही"; मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल? उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Uddhav Thackeray) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष, या मुंबईकरांनी आजसुद्धा नाही म्हटलं तरी मतं कमी नाही झालेली. सगळे गड आपण राखलेले आहेत."

"जे जे मुंबईचे गड होते ते आजसुद्धा शाबूत आहेत. आपण ही लढाई कशी दिली. यावेळी पहिल्या प्रथम मुंबईमध्ये देखील पैशांचा वापर केला गेला. अनेक ठिकाणाहून माझ्याकडे काही तक्रारी आल्या. दार बंद असले तर दाराच्या खालच्या फटीतून लिफाफे फेकले गेले. विकत घेत आहे तुम्ही महाराष्ट्र."

"मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल. जी जिवंत मने आहे. ती आजसुद्धा माझ्या भगव्यासोबत शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत हे परत तुम्ही दाखवून दिलेले आहे. हीच आपली ताकद आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Summary

  • 'मुंबईवरचा भगवा उतरवून काय मिळालं?'

  • 'महापालिकेत आपला निसटता पराभव झाला'

  • मुंबई पालिकेच्या निकालावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com