Hingoli Rain
महाराष्ट्र
Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं प्रचंड नुकसान
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Hingoli Rain ) राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हिंगोलीत रात्री अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसाचा फटका शेतातील हरभरा, गहू, ज्वारी पिकांना बसला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.
गहू, ज्वारी पीक आडवे झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Summary
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस
पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका
गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं प्रचंड नुकसान
