Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : "खासदारांचा काहीतरी गैरसमज झाला; राजकीय वयानुसार भविष्य खूप मोठे आहे त्यांच्याकडे संयम ठेवून बोलावे"

चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Vijay Wadettiwar) चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर आता माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "खासदारांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यांच्याकडे खूप मोठे भविष्य आहे त्यांच्या राजकीय वयानुसार. संयम ठेवून बोलावे. मी जर असे म्हटले की , जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडले तर सगळेच नगरसेवक माझ्याकडे येतील. पण आपल्याला तसे करायचे नाही. शेवट आपल्याला एकत्र यायचे आहे आणि एकत्र येऊनच चंद्रपूरचा महापौर करायचा आहे. ही त्यामागची आमची भूमिका होती."

" गैरसमज काही झाला असेल तर दूर करू. जे काही नगरसेवक आहेत ते एकत्र बसतील. नेत्यांची गरज नाही. नगरसेवक एकत्र बसून हायकमांडच्या बरोबर बसून कोण महापौर ठरवायचा कोण गटनेता ठरवायचा ते सांगतील आणि त्याप्रमाणेच करावे लागेल. माझ्याकडेही लोक संशयाने बघतात मी पक्ष सोडून जाईन. त्यांच्याकडेही लोक संशयाने बघतात ते पक्ष सोडून जातील. अशा चर्चा होतात."

"माझा मतदारसंघ, माझा मतदारसंघ म्हणजे मालक कोणी ठरत नाही. माझ्याही मतदारसंघात येऊन थोडासा जातीचा विषय काढून विधानसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी जे काही केलं ते मी विसरलो आणि आम्ही एकत्र आलो. मला खूप त्रास झाला त्याचा. समाजामध्ये गैरसमज निर्माण केला गेला. मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक आहे." असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com